Announcements CMS College Mobile app

NSS

लिंगदरी येथील रासेयो शिबिराची सांगता

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मौजे लिंगदरी येथे "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष शिबीर" आयोजित करण्यात येत आहे.
दिनांक २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिबिराची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली.
याप्रसंगी लिंगदरी गावचे प्रथम नागरिक श्री. राठोड विलास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात कार्यक्रमाधिकारी प्रा. टी.यू. केंद्रे यांनी सदरील शिबिरात राबविल्या राबविण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन, गुंडा बाबत संस्थांची स्वच्छता- वृक्ष लागवड,बालविवाह, रस्ते सुरक्षा-युवक,सौर ऊर्जा,पशु आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती,कडधान्याचे आहारातील महत्त्व,नेत्ररोग तपासणी इत्यादी महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या उपयोगितेविषयी लेखाजोगा मांडला.
मुख्य मार्गदर्शनात श्री.विलास राठोड यांनी सदर शिबिराचे मौजे लिंगदरी येथे आयोजन करून गावाच्या एकंदरीत विकासाच्या कामासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी जो प्रामाणिक प्रयत्न केला तो अभिनंदनास पात्र आहे आणि याबद्दल मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभारी आहे.तसेच भावी काळात देखील अशा प्रकारचे शिबिर आमच्या गावात राबवावे अशी विनंती देखील याप्रसंगी त्यांनी केली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक समाधान वाघमारे, मुख्याध्यापक गजानन मुळे, सहशिक्षक चव्हाण सर, पवन राठोड,कृष्णा राठोड, राजेश राठोड, गोकुळ आडे, श्री. पी. बी. कऱ्हाळे, श्री. डी. एन. भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचलन कार्यक्रमाधिकारी डॉ.आर. व्ही. नवगणकर यांनी तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.व्ही.बी. कल्याणकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.