Announcements CMS College Mobile app

NSS

लिंगदरी येथील गुंडा बाबा संस्थान येथे रास मार्फत वृक्ष लागवड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मौजे लिंगदरी येथे "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष शिबीर" आयोजित करण्यात येत आहे.
सदर शिबिरामध्ये दि.२३ जानेवारी रोजी "गुंडा बाबा संस्थान" येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय,सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड करण्यात आली.
बौद्धिक वर्गात प्रारंभी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
डॉ. एस. एस. अग्रवाल यांनी "रस्ते सुरक्षा आणि युवक" याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. आर. ए. जोशी यांनी "सौर ऊर्जा"या विषयावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कार्यक्रम अधिकारी प्रा टी.यू. केंद्रे यांनी वृक्ष लागवड, रस्ते सुरक्षा आणि सौर ऊर्जा याबद्दल गोषवारा सांगत त्याचे महत्त्व देखील विशद केले.
कार्यक्रमाचे संचलन डॉ.आर. व्ही. नवगणकर यांनी तर आभार डॉ. व्ही.बी. कल्याणकर यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी डॉ. ए.जी. अंभोरे,प्रा. यू.पी.सुपारे, प्रा. डी.पी. तडस,डॉ. आर.टी. चव्हाण,डॉ.पी.एन. तोतला, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते
सदर कार्यक्रमासाठी श्री.पी.बी. कऱ्हाळे, श्री. डी.एन. भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.