Announcements CMS College Mobile app

NSS

लिंगदरी येथील गुंडा बाबा संस्थानची स्वयंसेवका मार्फत स्वच्छता

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तोष्णीवाल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मौजे लिंगदरी येथे "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास विशेष शिबीर" आयोजित करण्यात येत आहे.
सदर शिबिरामध्ये दि.२२ जानेवारी रोजी "गुंडा बाबा संस्थान" येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. ए.जी.अंभोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व ग्रामस्थ यांना "बालविवाह" यांची दुष्परिणाम व त्यासंबंधी असणाऱ्या कायद्यातील तरतुदी या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
यानंतर कार्यक्रमाधिकारी प्रा. टी. यु. केंद्रे,डॉ.आर. व्ही. नवगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी लिंगदरी येथील जागृत देवस्थान "गुंडाबाबा संस्थान" याची स्वच्छता केली.
सदर कार्यक्रमासाठी श्री.पी.बी. कऱ्हाळे, श्री. डी.एन. भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.सदर कार्यक्रमासाठी ग्रामस्थ उपस्थित होते.