Announcements CMS College Mobile app

Youth Festival 2022

राष्ट्रचेतना २०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात तोष्णीवाल महाविद्यालयाला विजेतेपद

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण टेक्निकल एण्ड मॅनेजमेंट कॅम्पस,विष्णुपुरी, नांदेड यांच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन राष्ट्रचेतना युवक महोत्सव २०२२ मध्ये विविध २८ कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले.
या युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात सिने अभिनेते श्री. मंकरद अनासपुरे, मा.कुलगुरु डॉ.उध्दव भोसले,माजी कुलगुरु पंडित विद्यासागर, हॅपी इंडिया व्हिलेज चे संस्थापक श्री.रवि बापटले, श्री.माधव गिते डेप्युटी कलेक्टर,अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे, डॉ.एल.एम.वाघमारे,परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके,रा.से.यो चे संचालक डॉ.मल्लिकार्जुन करजगी,विद्यार्थी विकास विभागाचे डॉ.सुर्यप्रकाश जाधव यांच्या हस्ते तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव येथील गणेश प्रकाश फासाटे या विद्यार्थ्याला स्पॉट फोटोग्राफी या कला प्रकारा मध्ये तृतीय परितोषिक मेडल व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.स्पॉट फोटोग्राफी या कलाप्रकारामध्ये विविध महाविद्यालयातील एकुण ४५ स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच तोष्णीवाल महाविद्यालयाचे अमोल अंभोरे वक्तृत्व स्पर्धा,रवि सुतार शास्त्रीय सूरवाद्य व अभिषेक शेळके व्यंग्य चित्रकला,कोलाज, पोस्टर मेकिंग, चित्रकला,वैष्णवी खंडेलवाल शास्त्रीय गायन,सुगम गायन यांनी एकूण ०९ कला प्रकारामध्ये सहभाग नोंदविला. या संघा सोबत संघव्यवस्थापक म्हणून डॉ.विजय वाघ सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी काम पाहीले.
विजेत्या स्पर्धेकाचे संस्थेचे अध्यक्ष श्री.ब्रिजगोपाल तोष्णीवाल, महाविद्यालयीन विकास समितिचे अध्यक्ष श्री. रमण तोष्णीवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीपाद तळणीकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षेत्तर कर्मचारी यासर्वानी विजेत्या व सहभागी स्पर्धेकांचे अभिनंदन केले.