Announcements CMS College Mobile app

Rally Ajegaon

तोष्णीवाल महाविद्यालय ते हुतात्मा स्मारक आजेगाव शोभायात्रेचे आयोजन

सेनगाव : दिनांक 26जानेवारी 2023 रोजी तोष्णीवाल महाविद्यालयाचे सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत आजादी का अमृत महोत्सवा निमित्त तोष्णीवाल महाविद्यालय ते हुतात्मा स्मारक आजेगाव पर्यन्त शोभायात्रेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या वेशभूषा आकाश उबाळे,अनिकेत कुहीले व अनिकेत तायडे या विद्यार्थ्यानी  परिधान करुन सुंदर देखावा सादर केला होता. देशभक्तिपर गीते,वंदेमातरम भारतमाता की जय,इंकलाब जिंदाबाद अशा राष्ट्रभक्तिच्या घोषणा देवुन हुतात्मा स्मारक आजेगाव पर्यन्त शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. ब्रिजगोपालजी तोष्णीवाल, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.रमणजी तोष्णीवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी.तळणीकर,आजादी का अमृत महोत्सव समिती चे समन्वयक डॉ.विजय वाघ, डॉ. संजीवकुमार अग्रवाल व डॉ. राजीव पैठणकर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या देशभक्तीपर शोभायात्रेत सहभागी झाले होते.  आजेगाव येथे यात्रा पोहोचल्यानंतर यात्रेचे तेथील सरपंच सौ.राणीताई नंदन काळे,महादेव काळे ,प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांनी शोभा यात्रेचे भव्य स्वागत केले.त्यानंतर हुतात्मा स्मारकाला अभिवंदन करण्यात आले. याप्रसंगी तोष्णीवाल महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.अशोक अंभोरे यांनी हुतात्मा बहिर्जी हनुमंतराव शिंदे यांच्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील शौर्याचा आढावा सर्वासमोर मांडला. त्यात त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेकांनी योगदान दिल्याचे नमूद करून हुतात्मा बहिर्जी शिंदे यांनी रजाकारांच्या कशा गोळ्या झेलून आपल्या प्राणांची आहुती आजेगाव या ठिकाणी दिली आणि त्याच भूमीत आज आपण सर्वजण त्यांच्या या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी जमलो आहोत असे प्रतिपादन केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्यानी आपल्या मनोगतात असे म्हटले की येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नव्या पिढीला स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या या हुतात्म्यांचे स्मरण ठेवणे गरजेचे असून त्यातून आपणही देशासाठी काही केले पाहिजे अशी प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजीव पैठणकर यांनी केले.