Announcements CMS College Mobile app

Rally Ajegaon

तोष्णीवाल महाविद्यालयामध्ये मशाल रैलीचे जोरदार स्वागत

सेनगाव : दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी आजादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने हिंगोली जिल्हा मशाल रैलीचे आगमन तोष्णीवाल महाविद्यालयात येथे झाले.  यावेळी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन मशाल रैलीत सहभागी विभिन्न महाविद्यालयातून सहभागी झालेले ११ विद्यार्थी व आजादी का अमृत महोत्सव समिति चे जिल्हा प्रमुख प्राचार्य भोयर ,मशाल रैलीचे प्रमुख डॉ.देशमुख,डॉ.वाघ,डॉ.फड,डॉ.वासनिक व डॉ.भिसे यासर्वोचें पुष्पगुच्छ देवून स्वागत प्राचार्य डॉ.एस.जी.तळणीकर,जिल्हा समन्वयक डॉ.एस.एस.अग्रवाल,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.विजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.अंभोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयातील विद्यार्थ्यानां मशाल रैलीचा उद्देश्य सांगीतला.आजादी का अमृत महोत्सव समिति चे जिल्हा प्रमुख प्राचार्य भोयर सरांनी आपल्या मनोगतामध्ये स्वांतत्र्य लढ्यातील हुतात्म्या बद्दल सविस्तर माहिती दिली.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य तळणीकर सरांनी स्वांतत्र्य लढ्यातील शहीद जवानाच्यां जिवनावर प्रकाश टाकला. यानंतर प्रा.फड यांनी सामाजिक एक्याची शपथ उपस्थिताना देवुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मशाल रैली महाविद्यालयात आल्यानंतर देशभक्तिपर गीते,वंदेमातरम भारतमाता की जय,इंकलाब जिंदाबाद अशा राष्ट्रभक्तिच्या घोषणेने परिसर दणानुन गेला होता. तसेच विद्यार्थ्याकरिता शहिद जवानाचे फोटो व माहिती प्रदर्शन ही भरविण्यात आले होते. यानंतर मशाल रैलीत सहभागी झालेले विद्यार्थी व प्राध्यापकांच्या भोजनाची व्यवस्था महाविद्यालयातर्फे करण्यात आली होती.यानंतर मशाल रैलीचे पुढील महाविद्यालयाकडे प्रस्थान झाले. यामशाल रैलीच्या स्वागत व नियोजना करीता प्रा.थोरात,प्रा. तडस, प्रा.गायकवाड, प्रा.तोष्णीवाल, डॉ.चव्हाण,श्री. कोपनर व श्री. शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमा चे सुत्रसंचालन डॉ.पजई यांनी केले. या मशाल रैली मध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षेकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.