Announcements CMS College Mobile app

Chess

लिंगदरी येथील ग्रामस्थांची रक्ततपासणी संपन्न

सेनगाव दि.१६-१२-२०२२तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सेनगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत मौजे लिंगदरी येथील ग्रामस्थांची राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय,सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तातील विविध घटकांची तपासणी व औषध-गोळ्यांच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.टी. यु. केंद्रे, डॉ. व्ही.बी. कल्याणकर,डॉ.आर. व्ही. नवगणकर यांनी लिंगदरी ग्रामस्थांच्या आहार-विहार व व्यसन यांचा अभ्यास करून रक्ताची तपासणी करणे व आलेल्या निष्कर्षानुसार योग्य ती उपचार पद्धती घेणे तसेच काही व्याधी असेल तर त्यावर योग्य असा उपचार कोठे केला जातो? याबद्दल प्रा.केंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामीण रुग्णालय, सेनगाव येथील डॉ. सचिन राठोड (वैद्यकीय अधीक्षक),श्री.संदीप राठोड (समुपदेशक),श्री. किशोर वानखेडे (समुपदेशक),स्वाती पारसकर (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), हागे मॅडम(प्रयोगशाळा तंत्रज्ञ) यांनी ग्रामस्थांच्या रक्ताचे नमुने गोळा केली तर सदर नमुन्यांची एच.आय.व्ही., सी.बी.सी.,रक्तातिल साखरेचे प्रमाण,एल.एफ.टी.,के.एफ.टी., कोलेस्ट्रॉल चे प्रमाण इत्यादी प्रकारच्या तपासण्या प्रयोगशाळेत करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन श्री. संदीप राठोड यांनी केले.
सदर रक्ताच्या तपासणी बरोबरच ग्रामस्थांना लोह, कॅल्शिअम व हिमोग्लोबिन इत्यादी प्रकारच्या औषध- गोळ्यांचे वाटप देखील करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. सुनिता राठोड (सरपंच,लिंगदरी), श्री.समाधान वाघमारे(ग्रामसेवक,लिंगदरी), श्री. काळे सर,श्री.चव्हाण सर, अंगणवाडी सेविका, आशाताई,गोकुळ आडे, राजेश राठोड यांनी मेहनत घेतली.
सदर शिबिरासाठी ग्रामस्थ पुरुष- महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.