Announcements CMS College Mobile app

Plantation

Plantation at Pankanhergaon

तोष्णीवाल महाविद्यालयाच्या वतीने हरित पानकन्हेरगाव मोहिमेचा शुभारंभ

दि.०७-०७-२०२२, गुरुवार रोजी तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव, तालुका प्रशासन, सेनगाव व ग्रामपंचायत पानकन्हेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हरित पानकन्हेरगाव या "ड्रीम-प्रोजेक्टची"कोनशिला अनावरण समारंभ व वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ कान्होबाच्या टेकडीवर संपन्न झाला.
माननीय श्री.जितेंद्र पापळकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या शुभहस्ते तसेच मा.श्री.संजय दैने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,हिंगोली), मा.श्री. उमाकांत पारधी (उपविभागीय अधिकारी, हिंगोली, तसेच मूळ संकल्पक वृक्ष लागवड ड्रीम प्रोजेक्ट हरित पानकन्हेरगाव), मा.बी.आर. तोष्णीवाल (अध्यक्ष, श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ येलदरी कॅम्प),सौ.शारदा देशमुख (सरपंच, पानकन्हेरगाव),मा. श्री.जीवक कुमार कांबळे (तहसीलदार, सेनगाव),श्री. शिवलिंग गोरे(गटविकास अधिकारी, सेनगाव),श्री.राहुल शेळके (तालुका वनरक्षक अधिकारी),मा.प्रवीण ऋषी (मुख्य अधिकारी, नगरपंचायत,सेनगाव) प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हरित पानकन्हेरगाव या ड्रीम प्रोजेक्ट चा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदरील प्रोजेक्ट अंतर्गत कान्होबाच्या टेकडीवर १०,००० वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्यात आला.शुभारंभ प्रसंगी ३०००पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली.पारंपारिक वृक्षांचे वृक्षारोपण-संगोपन करण्याचा निश्चित यप्रसंगी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक मा.उमाकांत पारधी (उपविभागीय अधिकारी, हिंगोली) यांनी केले. याप्रसंगी ड्रीम प्रोजेक्ट बाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. यामाध्यमातून १५ एकर परिसरात पारंपारिक वृक्ष लावून निसर्गाचा समतोल साधला जाणार आहे. वृक्ष लागवड न थांबता त्याचे संगोपन कसे करता येईल याचाही विचार केला गेला आहे.हरित पानकन्हेरगाव हे आदर्श पर्यटन स्थळ व्हावे जेणेकरून भविष्यात यांचे अनुकरण परिसरातील ग्रामस्थ करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
माननीय बी.आर.तोष्णीवाल यांनी सदरील प्रकल्पासाठी कूपनलिका,पाईपलाईन व ड्रीप ची व्यवस्था करण्याचे जाहीर केले. उपरोक्त बाबीवर होणारा खर्च आपल्या वतीने केला जाईल असे ग्रामस्था समोर जाहीर केले.
मा.संजय दैने यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे हे सांगून सदरील प्रकल्प हा अभिनंदनास पात्र असून त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी समाजातील विविध घटकांनी आपले योगदान देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
मा. जिल्हाधिकार पापळकर सर यांनी हा प्रकल्प नक्कीच नावारूपास येईल अशी भावना व्यक्त करत, कोविड प्रसंगी ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक लोकांना प्राण गमवावे लागले.एक वृक्ष शेकडो ऑक्सिजन सिलेंडरचे काम करणार आहे त्यामुळे एक वृक्ष लावून त्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. उपरोक्त प्रकल्पाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे वचन दिले. याप्रसंगी अनेक दानशूरांनी वृक्ष देणगी देण्याचे जाहीर केले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विश्रांती घेता यावी यासाठी बेंचची व्यवस्था ग्रामस्थांनी करण्याचे मान्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रामविकास अधिकारी श्री.मेनकुदळे,प्रा.एस. बी.फड़ यांनी तर आभार डॉ.एस.आर. पजई यांनी व्यक्त केले. तोष्णीवाल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.टी.यू.केंद्रे व डॉ. व्ही. बी.कल्याणकर, स्वयंसेवक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.याप्रसंगी पानकन्हेरगाव येथील वृक्षप्रेमी गावकरी मंडळी, तलाठी,मंडळ अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेचे कर्मचारी, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ग्रामस्थांचा उत्साह हा अधोरेखित करण्याजोगा होता.